शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या सुरक्षेविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: August 27, 2016 06:07 IST

राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज यांच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे केंद्राने सांगितल्यानंतर न्यायालयाने हा पवित्रा घेतला. ‘ठाकरे यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरविली आहे. यात केंद्राचा संबंध नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंगरा सेहगल यांच्या खंडपीठाने म्हटले. हा या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेला जनहिताचा मुद्दा नाही. त्यामुळे यावर सुनावणी करू शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले. राज ठाकरे घटनात्मक पदावर नाहीत. लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे सरकारने दिलेली ‘वाय श्रेणी’ची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणाची होती याचिकामिथिलेश कुमार पांडे यांनी ही याचिका केली होती. द्वेषमूलक भाषणे करणारे वा ज्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत अशा खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.