शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सिस, कोटकवर छापे

By admin | Updated: December 24, 2016 01:28 IST

अ‍ॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला

अहमदाबाद : अ‍ॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून, त्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. ईडीने अहमदाबादच्या मायामनगर शाखेवर छापा टाकून १९ खात्यांची छाननी केली. या खात्यांनी केवायसीची (नो युवर कस्टमर) पूर्तता केलेली नसल्याचे आढळले आणि त्यात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर ८९ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात पाठवण्यात आली. या प्रकरणी बँकेच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी होत आहे. नोटाबंदीनंतर अ‍ॅक्सिस बँकेच्या दिल्ली, नॉयडा येथील शाखांवरही छापे घालण्यात आले आहेत. आतापर्यंत त्या बँकेचे जवळपास ३0 कर्मचारी निलंबित असून, काहींना अटकही करण्यात आली आहे. ठरावीक मंडळींना जुन्या नोटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात नव्या नोटा देणे, मनी लाँड्रिंग, हवाला आणि बोगस लॉकर्समध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या व नव्या नोटा यामुळे अ‍ॅक्सिस बँक वादात सापडली आहे. मात्र तपास यंत्रणांना बँक पूर्ण सहकार्य करीत असल्याचा दावा बँकेच्या व्यवस्थापनाने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कोटक महिंद्रवरही छापानवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोटक महिंद्र बँकेच्या येथील दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील शाखेवर तिच्या दोन खात्यांसंदर्भात छापा घातला. अ‍ॅक्सिस बँकेतील घोटाळ्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटक महिंद्र बँकेवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र आमच्याकडे कोणतीही बनावट खाती नाहीत, असा दावा बँकेने केला आहे. कोटक महिंद्र बँकेचे प्रवक्ते रोहित राव म्हणाले की, केवायसीच्या पूर्ततेमध्ये कोणतीही उणीव राहिलेली नाही. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने बँकेच्या व्यवस्थापकांनाही प्रश्न विचारले आहेत. बँकेच्या विरोधात कोणताही अहवाल दिला गेलेला नाही व बँकेत कोणतीही बनावट खाती नाहीत, असे राव म्हणाले. तरीही बँक चौकशीला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले.दोघांना अटक : मात्र कोटक महिंद्र बँकेतील काही व्यवहार संशयास्पद असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. तेथील बोगस खात्यांबाबत दिल्ली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या खात्यात ३४ कोटी रुपये असल्याचे शुक्रवारी उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांनी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले असून, त्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील कॉर्पोरेशन बँकेतील खात्यांचा उपयोग केला, असे सांगण्यात येत आहे.