शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या विमानात घातपाताचा संशय

By admin | Updated: September 19, 2016 03:37 IST

विमानातील इंधन पूर्णपणे बदलायला लावल्याची घटना गेल्या बुधवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याची माहिती आता समोर आली

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रवास करणार असलेल्या विमानात घातपात केला जाण्याची संभाव्य शक्यता समूळ निपटून करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजी कमांडोंनी या विमानातील इंधन पूर्णपणे बदलायला लावल्याची घटना गेल्या बुधवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याची माहिती आता समोर आली आहे.१४ सप्टेंबर रोजी वाराणसीला जाण्यासाठी राहुल गांधी इतर प्रवाशांसोबत सकाळी ८.५५ वाजता सुटणाऱ्या इंडिगोच्या विमानात येऊन बसले. व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या सुरक्षा मॅन्युअलमध्ये विमानाने प्रवास करत असताना त्या विमानाचे इंधन, घातपाताची दूरान्वयानेही शक्यता राहू नये यासाठी, तपासून पाहण्याचे बंधन आहे. त्यानुसार राहुल गांधीच्या एसपीजी कमांडोंनी इंडिगोच्या या विमानातील इंधनाची तपासणी (अ‍ॅक्वा टेस्ट) केली. एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा केलेल्या तपासणीत विमानातील इंधनात प्रमाणाबाहेर भेसळ असल्याचे दिसून आले, असे सूत्रांनी सांगितले.अशा भेसळयुक्त इंधनाने विमानोड्डाण करणे धोक्याचे वाटल्याने एसपीजी कमांडोंनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना विमानातील इंधन पूर्णपणे काढून नवे चांगले इंधन भरण्यास लावले. इंधनाचे हे पुनर्भरण होण्यात सुमारे ५० मिनिटे गेली व अखेरीस तासाभराच्या विलंबाने विमानाने वाराणसीकडे प्रस्थान केल, असेही सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी यांच्याशी निकटवर्ती सूत्रांनी या घटनेस दुजोरा देताना सांगितले की, सुरुवातीच्या प्रवाशांसोबतच राहुल गांधी विमानात जाऊन बसल्यावर त्यांच्या एसपीजी कमांडोंनी त्यांचे सुरक्षा तपासणीचे काम नियमानुसार सुरु केले. हे काम सुरु असल्याने विमानास ३० मिनिटांचा विलंब होईल, असे वैमानिकाने सुरुवातीस जाहीर केले. नंतर वैमानिकाने तांत्रिक कारण देत तासाभराचा विलंब जाहीर केला.‘या बाबतीत आम्ही कोणताही तपशील देऊ शकत नाही,’ असे सांगून इंडिगोच्या प्रवक्त्याने मात्र अधिक बोलण्यास नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>इंधनाची तपासणी आधी करासूत्रांनुसार या घटनेनंतर राहुल गांधी यांनी एसपीजीच्या संचालकांकडे हा विषय उपस्थित केला व व्हीव्हीआयपीच्या प्रवासामुळे इतर प्रवाशांना होणारा विलंब टळावा यासाठी विमानाच्या इंधनाची तपासणी पुरेसा वेळ राखून आधीच करण्यात यावी, असे त्यांना सुचविले. >तपासणी सक्तीचीचराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा ज्यांना एसपीजीची सुरक्षा आहे अशी कोणतीही व्हीव्हीआयपी व्यक्ती सैन्यदलांच्या, खासगी चार्टर किंवा नियमित व्यापारी विमानाने प्रवास करणार असते तेव्हा त्या विमानातील इंधन शुद्ध आहे की नाही याची खात्री करणे हे सुरक्षा मॅन्युअलनुसार सक्तीचे असते.