शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा,मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 23:15 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्यापराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

राजा माने

मुंबई - काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे  यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच, खुद्द राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते कामाला लागले असून या नेत्यांच्या यादीत सुशीलकुमार हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे सुशीलकुमार यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्यापराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल यांचा राजीनामा नाकारला. राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. राहुल गांधी राजीनामा मागे घेण्यासाठी तयार नसल्याने अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर आली. त्यात सर्वप्रथम राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव समोर आले होते. मात्र नंतर हे नाव मागे पडले. त्यातच आता सुशीलकुमार यांचे नाव निश्चित झाले असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. मात्र अध्यक्षपदा बाबत पक्षश्रेष्ठींशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचा खुलासा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

 

वास्तविक पाहता राहुल गांधी यांनीच अध्यक्ष म्हणून राहावे अशी भावना काँग्रेसच्या नेत्यांची आणि आपली असल्याचे शिंदे म्हणाले. तर राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी आघाडी उभारली असून याचे नेतृत्व खुद्द सुशीलकुमार शिंदे करत असल्याचे समजते. तर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार असून त्यानंतरच काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी की सुशीलकुमार शिंदे हे स्पष्ट होणार आहे.