राहुल गांधी भला माणूस- अखिलेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 04:41 IST2016-09-09T04:41:06+5:302016-09-09T04:41:06+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भला माणूस आहेत. त्यांनी वारंवार उत्तरप्रदेशात यायला हवे. ते जास्तवेळा आले तर त्यांच्याशी मैत्री होईल

Rahul Gandhi is a good man - Akhilesh | राहुल गांधी भला माणूस- अखिलेश

राहुल गांधी भला माणूस- अखिलेश

लखनौ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भला माणूस आहेत. त्यांनी वारंवार उत्तरप्रदेशात यायला हवे. ते जास्तवेळा आले तर त्यांच्याशी मैत्री होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरूवारी त्यांची प्रशंसा केली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर अखिलेख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राहुल गांधी अमेठीचे खासदार आहेत हे आमचे भाग्य असून त्यांनी उत्तर प्रदेशात येत रहावे. दोन चांगले लोक एकत्र आले तर त्यात चुकीचे काय, असा सवालही त्यांनी केला. तथापि, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षात युती होऊ शकते काय याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Web Title: Rahul Gandhi is a good man - Akhilesh