असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 02:58 PM2020-08-30T14:58:22+5:302020-08-30T15:01:13+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे.

rahul gandhi attack modi government over whatsapp digital banking plan  | असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

Next

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हॉट्सअ‍ॅप डिजिटल बँकिंगवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात 40 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपला पैशांच्या देवाणघेवाणीची सेवा सुरू करायची असेल तर मोदी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. अशात, व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे.

भारतात डिजिटल बँकिंग सेवा सुरू करण्याची व्हॉट्सअ‍ॅपची इच्छा आहे. 22 जुलैला झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये  व्हॉट्सअ‍ॅपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतातील प्लॅन स्पष्ट केला. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील प्रमुख अभिजीत बोस यांनी सांगितले, की यूपीआयावर आधारलेल्या सेवांप्रमाणेच याची सुरुवात होईल. मात्र, भारतात लोकांना फायनांशिअल सेवांपर्यंत पोहोचवणे आणि बँकांच्या डिजिटल सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हा व्हॉट्सअ‍ॅपचा मुख्य उद्देश्य आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आता बँकांशी मिळवणार हात -
कंपनी या सुविधा, बँकांशी पार्टनरशिप करून, त्यांच्यासोबत काम करून, नॉन-बँकिंग फायनांशिअल कंपन्यांच्या सोबतीने आणि विमा कंपन्यांच्या साथीने लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. अभिजीत बोस यांनी सांगितले, की येणाऱ्या काळात ते अनेक पायलट प्रोजेक्ट्सवर काम करणार आहेत. यादरम्यान या सेवांत येणाऱ्या अडचणींचा विचार केला जाईल आणि त्यांचे समाधानही केले जाईल.

या 3 सेवा सुरू करण्याच्या विचारात व्हॉट्सअ‍ॅप -
व्हॉट्सअ‍ॅप बँका आणि इतर फायनांशिअल सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सोबतीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी 3 विशेष सुविधा देण्याची योजना तयार करत आहेत. याच्या पहिल्या सेवेत पेन्शन, दुसऱ्या सेवेत विमा आणि तिसऱ्या सेवेत मायक्रो लोनचा समावेश आहे. 

देशात जवळपास 30 कोटी लोकांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मात्र, ते असे करत नाहीत. याचे एक कारण असेही आहे, की या स्कीम विकण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. तसेच डिजिटल लिटरेसीच्या आभावामुळे हे अधिक कठीन होते. व्हॉट्सअ‍ॅप या सुविधा लोकांना विकण्यासाठी जो खर्च येतो तो अत्यंत कमी करण्याची योजना आखत आहे. यात पेन्शनप्रमाणेच विमा आणि मायक्रो क्रेडिटचीही सुविधा आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

Web Title: rahul gandhi attack modi government over whatsapp digital banking plan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.