लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:38 AM2020-08-30T11:38:42+5:302020-08-30T11:39:37+5:30

तसेच यावेळी मोदींनी लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, असे आवाहनही जनतेला केले आहे.

Mann Ki Baat pm narendra modi address the nation sunday | लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. मोदी म्हणाले, या कोरोना काळात देशातील नागरिकांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. प्रत्येक उत्सवात लोक संयम पाळत आहेत. देशात आयोजित होणाऱ्या प्रत्येक उत्सवात ज्या पद्धतीने संयम आणि साधेपणा दिसत आहे. हे अभूतपूर्व आहे. तसेच यावेळी मोदींनी लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, असे आवाहनही जनतेला केले आहे.

खेळणे आकांक्षांना पंख देतात -
मोदी म्हणाले, खेळण्या मुलांची कल्पनाशक्ती वाढवतात. त्या आपल्या आकांक्षांना पंख देतात. खेळी केवळ मनोरंजनाचे साधनच नाही, तर त्या मनाला एक दिशा देतात आणि अनेकदा धेय निर्धारित करायलाही मदत करतात. आता सर्व खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. चला, आपण आपल्या युवकांसाठी नव्या प्रकारची चांगली क्वालिटी असलेली खेळणी बनवू या. 

मुलांवर खेळण्यांचा प्रभाव असतो, यावर राष्ट्रीय शिक्षणिक धोरणातही लक्ष देण्यात आले आहे. खेळता-खेळता शिकणे, खेळणी तयार करायला शिकणे, जेथे खेळण्या तयार केल्या जातात, तेथे भेटी देणे, हा सर्व करिकुलमचा एक भाग बनवण्यात आला आहे. आपल्या देशात प्रचंड आयडियाज आहेत. एवढ्या कन्सेप्ट्स आहेत, आपला इतिहासही अत्यंत समृद्ध आहे. आपण त्यावर गेम्स तयार करू शकतो का?, असेही मोदी म्हणाले.

थारू समाजाच्या लोकांच्या बरनाचाही उल्लेख -
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण अगदी सूक्ष्मपणे विचार केला, तर एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला लक्षात येते, की आपले उत्सव आणि पर्यावरण, यांचा फार जवळचा संबंध आहे. बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये तेथील आदिवासी समाजातील लोक गेल्या शेकडो वर्षांपासून 60 तासांसाठी लॉकडाउन, त्यांच्या भाषेत ‘60 तासांच्या बरना’चे पालन करतात. प्रकृतीच्या संरक्षणासाठी येथील थारू समाजातील लोकांनी बरनाला आपल्या परंपरेचा एक भाग बनवले आहे आणि ते याचे शेकडो वर्षांपासून पालन करतात. 

दोन डझन अ‍ॅप्सना केंद्राची मंजुरी -
पंतप्रधान मोदींनी यावेळी अ‍ॅप्स इनोव्हेशन चॅलेन्जवरही भाष्य केले. ते म्हणाले, 'योग्य तपासणीनंतर, वेगवेगळ्या प्रकारच्या दोन डझन अॅप्सची ऑर्डर देण्यात आली आहे. 

एक अ‍ॅप आहे, कुटुकी किड्स लर्निंग अ‍ॅप. याच्या सहाय्याने मुले गाणे आणि गोष्टींच्या माध्यमानेच गणित, विज्ञान आणि बरेच काही शिकू शकतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि गेम्सदेखील आहेत.

एका अ‍ॅपचे नाव आहे Ask सरकार. याच्या सहाय्याने आपण चॅट बॉटच्या माध्यमाने इंटरअ‍ॅक्‍ट करू शकता आणि कुठल्याही सरकारी योजनेची योग्य माहिती मिळवू शकता. या अ‍ॅप्समध्ये फिटनेससंदर्भातील एका अ‍ॅपचाही समावेश आहे.

Web Title: Mann Ki Baat pm narendra modi address the nation sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.