शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:50 IST

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत

नवी दिल्ली - भारत-पाक यांच्यातील तणाव वाढल्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे.  मात्र पाकच्या गोळीबारीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर देणं सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी, मेंढर सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार सुरु आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यात पाकिस्तानी सैन्यातील जवानही मारले गेल्याची माहिती आहे. 

मंगळवारी दुपारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान रवी रंजन कुमार सिंह शहीद झाले आहेत. ३६ वर्षीय रवी रंजन कुमार हे बिहारच्या गोप बीघा गावात राहणारे आहेत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी रिता देवी आणि मुलं असं कुटुंब आहे. 

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजौरी सेक्टरमध्ये पाक सेनेची एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. पाककडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीही जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून दिवसभर गोळीबार सुरु होता. उरी आणि राजौरी या भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तानचे ३ जवान भारताने ठार मारले. 

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर