शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख ७४ हजार क्विंटल कापसाची खरेदी

By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST

नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते.

नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते. जिल्ह्यात कापूस पणन महासंघामार्फत किनवट येथे ९१३३ क्विंटल, भोकर ४२३६ क्विंटल तर धर्माबाद येथे २४ क्विंटल कापसाची सीसीआयची खरेदी केली आहे. तर खाजगी व्यापार्‍यांनी २ लाख ३२ हजार ३५९ क्विंटलची तसेच सीसीआयमार्फत २ लाख २८ हजार ७१८ क्विंटलची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकर्‍यांनी सीसीआयलाही कापूस देण्यासाठी पसंती दिल्याने सीसीआयही आघाडीवर दिसते. शासनाची विविध भागात खरेदी केंद्रे सुरु करुनही खाजगी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या दारापुढे वाहने नेत थेट खरेदी सुरु केली आहे. शिवाय पैसेही रोख देत असल्याने त्यांच्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे.सध्या सीसीआय ३९०० ते ३९५० रुपयेतर खाजगी व्यापारी ३७०० ते ३८०० रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत.सीसीआयमार्फत चालू बाजारभावाने तर कापासून पणन महासंघ शासनाच्या हमीभावाने खरेदी करते. तर खाजगी व्यापारी हे बाजारातील चालू दर पाहूणच खरेदी करतात.शासनाचा हमीभाव उत्पादन खर्चावर आधारित चांगला असल्यास बाजारातील कापसाचे भाव टिकून राहण्यास मदत होते. गतवर्षी कापसाला सरासरी ४४०० ते ४७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.खाजगी व्यापारी शेतकर्‍यांना रोख स्वरुपात रक्कम जागेवरच दिली जाते. तर कापूस पणन महासंघामार्फत कापूस विक्री केल्यास बँक ऑफ इंडियाचा धनादेश दिला जातो. बँक ऑफ इंडियाच्या शाखा तीन ते चारच असल्याने चार-चार आठवडे धनादेश वटण्यास विलंब लागतो. सीसीआयमार्फत खरेदीच्या सात दिवसानंतर शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते.शिवाय शेतकर्‍यांना स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करुन कापूस सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आणावा लागतो. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कापूस पणन महासंघाकडून दूर जात असला तरी यावर्षी मात्र शेतकर्‍यांना सीसीआयला खाजगी व्यापार्‍याच्या बरोबरीत पसंती दिल्याचे चित्र आहे. गतवर्षी जिल्ह्यातील वेेगवेगळ्या १२ खाजगी कापूस खरेदी केंद्रावर डिसेबंरअखेर ३ लाख ८६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. खाजगी खरेदी केंद्रावर एकूण ३ लाख ५० हजार ६५८ क्विंटल खरेदी झाली आहे. तर सीसीआयमार्फत विविध खरेदी केंद्रावर ३२४१९ क्विंटल अशी एकूण ३ लाख ८३ हजार ७७ क्विंटल एवढी खरेदी झाली होती.