शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती चीनला दिली; भारतीय पत्रकारासह तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:28 IST

चिनी महिला । नेपाळी नागरिकाचाही कृष्णकृत्यांमध्ये समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या सीमेवरील भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती चिनी गुप्तहेर यंत्रणांना पुरवीत असल्याच्या आरोपावरून संरक्षण विषयावर लेखन करणारे मुक्त पत्रकार राजीव शर्मा, तसेच एक चिनी महिला व नेपाळी नागरिक अशा तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीआहे.

डोकलाम, गलवान येथे भारतीय सैन्य कशाप्रकारे तैनात केले आहे याची माहितीही राजीव शर्मा चीनला पुरवीत होता, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.राजीव शर्माला दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याच्या केलेल्या चौकशीनंतर क्विंग शी ही चिनी महिला, तसेच राज बोहरा या नेपाळी नागरिकालाही पोलिसांनी अटक केली आहे.या त्रिकुटाकडून गोपनीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. राजीव शर्मा हा चिनी गुप्तहेर संघटनेच्या मायकेल नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. चीन, भूतानलगतच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती राजीवने चीनला पुरविली होती.सहा महिन्यांत ४० लाख रुपयांची कमाईच्२०१६ सालापासून राजीव शर्मा हा चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रासाठी दर महिन्याला १० लेख लिहीत असे. त्या प्रत्येक लेखाचे मानधन म्हणून राजीवला चीनकडून ५०० डॉलर मिळत; पण हा दिखावा होता. खरेतर भारतीय लष्कराची गोपनीय माहिती चीनला पुरविल्याच्या प्रत्येक कामगिरीसाठी हे पैसे त्याला बनावट चिनी कंपन्यांमार्फत देण्यात येत असत.

च्अशा रीतीने राजीव शर्मा दर महिन्याला ५ हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करीत असे. गेल्या सहा महिन्यांत राजीवने अशा प्रकारे ४० लाख रुपये मिळविले. बनावट चिनी कंपन्यांचे काम दिल्लीमध्ये क्विंग शी ही चिनी महिला व राज बोहरा हा नेपाळी नागरिक पाहत होते. त्यांच्या कंपन्यांमार्फत राजीव शर्मा याला मोबदला पोहोचता केला जायचा. त्यामुळे क्विंग शी, राज बोहरा यांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्व व्यवहाराची ईडीमार्फतही चौकशी होणार असल्याचे कळते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन