शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची पातळी घसरली

By admin | Updated: February 21, 2017 01:35 IST

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या

लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आता वैयक्तिक पातळीवर टीका सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप व टीका करताना गाठलेली ही पातळी उत्तर प्रदेशच्या मतदारांनाही भावलेली नाही.ही तर बहेनजी संपत्ती पार्टी : नरेंद्र मोदीजालौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बसप नेत्या मायावती यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधाची खिल्ली उडवून बसप आता ‘बहेनजी संपत्ती पार्टी’ झाला आहे, असा टेला लगावला. प्रचार सभेत ते म्हणाले की, जे लोक स्वत:साठी संपत्ती गोळा करतात ते कधीही लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्याबद्दल मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यावरही टीका केली. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला मी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर मात्र एकत्र आले. मोदी म्हणजे ‘निगेटिव्हदलित मॅन’ : मायावतीसुलतानपूर (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना ते ‘श्री. निगेटिव्ह दलित मॅन’ (दलितविरोधी नेते) आहेत, असे येथे म्हटले. त्या म्हणाल्या ‘‘बसपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधान अस्वस्थ झाले आहेत म्हणूनच ते सर्वोच्च नेत्याबद्दल हलक्या गोष्टी बोलतात.’’ शब्दांचा वापर करण्यात मोदी कुशल असले तरी जेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते त्यावेळी ते सगळे विसरतात. आज मला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला भाग पडले, असेही त्या म्हणाल्या.गाढवांची जाहिरात करू नये : अखिलेशरायबरेली : ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांना दिला. बच्चन हे गुजरातचे पर्यटन सदिच्छा दूत आहेत. राज्याच्या कच्छमधील जंगली गाढव अभयारण्याला पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून ते जाहिरातीत शिफारस करतात. बच्चन यांचे नाव न घेता यादव म्हणाले की,‘एक गधे का विग्यापन आता है. मैं इस सदी के सबसे बडे महानायक से कहुँगा के अब आप गुजरात के गधों का प्रचार मत करीए.’ गाढवांचीही जाहिरात होत असेल तर काय होईल, असा प्रश्न यादव यांनी उपस्थितांना विचारला.