शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

By admin | Updated: January 22, 2017 13:20 IST

हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, कुकर, गरिबांना मोफत धान्य अशा अनेक घोषणांचा पाऊस

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि, 22 -  हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, कुकर, गरिबांना मोफत धान्य अशा अनेक घोषणांचा पाऊस अखिलेश यादव यांनी आज जाहीर केलेल्या समाजवादी पडला. मात्र मुलायम सिंग यादव यांच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे सपामध्ये अद्यापही सगळे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.  
अखिलेश यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात लहान मुले महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी काही ना काही घोषणा करण्यात आली आहे. कुपोषित मुलांसाठी  तूप, महिलांना  प्रवास भाड्यात 50 टक्के सूट, विमानतळांवर एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा, गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ अशा अनेक घोणषा अखिलेश यादव यांनी जाहीरनाम्यातून केल्या आहेत. तसेच  हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, तसेच  स्टार्टअप योजना, शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी अँम्ब्युलन्समधून डॉक्टर पाठवण्याची सुविधा,  चौकीदार, सुरक्षारक्षकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. 
कार्यक्रमाला मुलामय यांची अनुपस्थिती
समाजवादी पार्टी आणि यादव कुटुंबीयातील मतभेद मिटल्याचे मानण्यात येत असतानाच आज झालेल्या समाजवादी पार्टीच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला मुलायम सिंग यादव अनुपस्थित राहिले. मुलायम यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या कार्यक्रमापूर्वी आझम खान मुलायम यांना आणण्यासाठी गेले होते, पण मुलायम आले नाहीत. अखेर मुलायम यांच्या अनुपस्थितीतच अखिलेश यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.