शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:55 IST

Google आणि Meta ला ईडीने नोटीस पाठवली आहे. ऑनलाइन बेटिंग प्रकरणी चौकशी होणार आहे.

गुगल आणि मेटा या दोन कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीने या दोन कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात बजावली आहे.  या दोन्ही कंपन्यांनी बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती आणि वेबसाइटना महत्त्व दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. 

गुगल आणि मेटावर या बेटिंग अ‍ॅप्सचा प्रचार केल्याचा आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन बेटिंग जाहिराती आणि वेबसाइट्स ठळकपणे ठेवल्याचा आरोप आहे. आता ईडीने दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना २१ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. 

Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले

पहिल्यांदाच टेक कंपनीला धरले जबाबदार

बेटिंग प्रकरणात पहिल्यांदाच भारतात काम करणाऱ्या मोठ्या टेक कंपनीला थेट जबाबदार धरले आहे. ईडीची ही कारवाई ऑनलाइन बेटिंगविरुद्धच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे, यामध्ये अनेक मोठ्या नावांची आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका तपासली जात आहे.

ऑनलाइन बेटिंग प्रकरणी आता ईडीने तपास वाढवल्याचे दिसत आहे. याआधीही अनेक चित्रपट तारे आणि सोशल मीडिया प्रभावक बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ईडी ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सच्या एका मोठ्या नेटवर्कची बारकाईने चौकशी करत आहे. यापैकी बरेच अ‍ॅप्स प्रत्यक्षात स्वतःला 'कौशल्य आधारित गेम' म्हणवून बेकायदेशीर बेटिंग करत असल्याचे दिसत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा कमावला आहे. 

मागील आठवड्यात ईडीने प्रसिद्ध अभिनेते, टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ईडीने अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली.

टॅग्स :googleगुगलMetaमेटा