शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देत पंतप्रधानही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी

By admin | Updated: October 31, 2014 10:38 IST

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग घेतला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग घेतला. यावेळी अर्थ व संरक्षण मंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, दिल्लीचे उप राज्यपाल नजीब जंग हेही उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाजवळील पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदींनी त्यांनाही आदरांजली वाहिली. 
विजय पथावर 'रन फॉर युनिटी'ला खुद्द पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केले. ' आर्य चाणक्य यांच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनीच देशाला एकसूत्रात बांधल्याचे सांगच महात्मा गांधी व सरदार पटेल यांची जोडी अद्भुत असल्याचे ते म्हणाले. 
जी व्यक्ती इतिहास विसरते ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळेच आपण ऐतिहासिक नेत्यांचा विसर पडू देऊ नये, असे त्यांनी सांगितले. जरी अनेक राज्य असली तरी आपले राष्ट्र एक आहे, देशात अनेक रंग असले तरीही तिरंगा एकच आहे असे सांगत विविधतेत एकता हीच आपल्या राष्ट्राची ओळख असल्याचे ते म्हणाले. आपण सर्व भारतीय जात, धर्म आणि समाज या मर्यादांच्या ओलांडून एकत्र येऊ, अशी शपथही त्यांनी देशवासियांना दिली. 
दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.