शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 23:35 IST

Narendra Modi called Mallikarjun Kharge: आज जम्मू काश्मीरमधील बिलावर येथे एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आज जम्मू काश्मीरमधील बिलावर येथे एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे खर्गे यांना काही काळासाठी भाषण थांबवून विश्रांती घ्यावी लागली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे प्रचारसभेत भाषण करत असताना बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले. काही वेळाने ते खाली बसले आणि काही मिनिटे भाषण केले, पण मध्येच थांबले. नंतर त्यांनी उभे राहून २ मिनिटे भाषण केले. निघताना त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की, मी ८३ वर्षांचे असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, असे ते म्हणाले होते.

यावेळी भाजपावर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, या लोकांना कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते, असा आरोपही खर्गे यांनी केला.

जम्मू-काश्मीरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा