शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या पंतप्रधानांचे आवाहन

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले़ स्वस्त विजेसाठी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवसंशोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले़

नवी दिल्ली : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले़ स्वस्त विजेसाठी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवसंशोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले़
येथे आयोजित पहिल्या अपारंपरिक ऊर्जा जागतिक गुंतवणूक परिषदेच्या (रि-इन्व्हेस्ट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जास्रोत असणार्‍या ५० देशांचा एक गट स्थापन करण्याच्या दिशेने भारत प्रयत्नशील आहे़ अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देणे आणि गरीब आणि दुर्गम भागात वीज पोहोचविणे हा यामागचा भारताचा उद्देश असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले़
देशात अद्ययावही औष्णिक, जल आणि अणु ऊर्जेवर भर दिला जात आहे; पण यापुढे सौर, पवन आणि जैवइंधन अशा ऊर्जा पर्यायांवर आपला भर असला पाहिजे़ मागास आणि दुर्गम भागात वीज पोहोचविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा पर्यायांवर अधिकाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले़ देशाच्या शेवटच्या कुटुंबापर्यंत वीज पोहोचत नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने विकासाच्या फळाची चव आम आदमीला चाखता येणार नाही़ ऊर्जा उत्पादने आणि दळणवळण क्षेत्रातील विकासाशिवाय आपल्याकडे अन्य कुठलाही पर्याय नसल्याचेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
----
पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद
तीन दिवसांच्या या बैठकीच्या पहिल्याच दिवशी २९३ कंपन्यांनी पाच वर्षांत २६६ मेगावॅट आपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली़ भारतीय स्टेट बँकेनेही पाच वर्षांत १५ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी आर्थिक मदतीची तयारी दर्शविली़
एनटीपीसी, सुजलॉन आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची प्रतिबद्धता व्यक्त केली़ सुजलॉन आणि वेल्सपनने प्रत्येकी ११ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली, तर एनटीपीसी आणि हिंदुस्तान पॉवर प्रोजेक्टस्ने प्रत्येकी हरित स्रोतांच्या माध्यमांतून १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले़