६१५ औषधांचा मूल्य नियंत्रित यादीत समावेश

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:23+5:302014-12-18T22:39:23+5:30

नवी दिल्ली- गेल्या सहा महिन्यात औषधांच्या किंमतीत घट झाली असून ६१५ जीवनावश्यक औषधांचा समावेश मूल्य नियंत्रणांतर्गत करण्यात आला असल्याची माहिती रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांनी लोकसभेला दिली. पुढील महिन्यात किंमती कमी केलेल्या नव्या जीवनरक्षक औषधांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Price of 615 drugs are included in the regulated list | ६१५ औषधांचा मूल्य नियंत्रित यादीत समावेश

६१५ औषधांचा मूल्य नियंत्रित यादीत समावेश

ी दिल्ली- गेल्या सहा महिन्यात औषधांच्या किंमतीत घट झाली असून ६१५ जीवनावश्यक औषधांचा समावेश मूल्य नियंत्रणांतर्गत करण्यात आला असल्याची माहिती रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांनी लोकसभेला दिली. पुढील महिन्यात किंमती कमी केलेल्या नव्या जीवनरक्षक औषधांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
त्यांनी नव्या सरकारने १७५ जीवनावश्यक औषदांचा समावेश मूल्य नियंत्रणाच्या यादीत केल्याचे सांगून, आता या औषधांची संख्या ६१५ झाल्याचे सांगितले. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करणे व त्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे यासाठी नवी पावले आखण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसच्या रंजीता रंजन व सुष्मिता देव यांनी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एचआयव्हीसारख्या आजारांच्या औषधांच्या किंमतीत वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी छत्तीसगडमध्ये नसबंदी शिबिरादरम्यान झालेल्या १७ महिलांच्या मृत्यूचाही मुद्दा यावेळी उपस्थित केला.

Web Title: Price of 615 drugs are included in the regulated list