शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रिमियम ट्रेन, हायटेक सेवा; ‘वंदे भारत’च्या सेवेकऱ्यांचे हाल, १८ तास काम पण पगार १० हजार…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:48 IST

Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये १८ तास काम करावे लागते. पण किमान वेतनही दिले जात नाही. विश्रांती घेण्याची जागाही नसते, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

Vande Bharat Train: भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम असलेली ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली. परंतु, याचवेळी वंदे भारत ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे. दिवसाला १८ तास मेहनतीचे काम पण पगार केवळ १० हजार मिळत असल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबईकरांना मोठी गुड न्यूज! ‘ही’ वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

आताच्या घडीला १६४ सेवा चेअर कार वंदे भारत ट्रेन देशभरात देत आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचे खासदार काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करताना रेल्वेतील खाजगीकरण आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या छळाचा मुद्दा उपस्थित केला. वंदे भारत ट्रेनमध्ये १८ तास काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली आणि समजून घेतली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण थेट संसद आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

प्रिमियम ट्रेन, हायटेक सेवा; ‘वंदे भारत’च्या सेवेकऱ्यांचे हाल

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी अलीकडेच वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. त्यांनी तिथे काम करणाऱ्या सफाई आणि केटरिंग कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना कळले की, कंत्राटदार त्यांना फक्त १० हजार देतात, दिवसाचे १८ तास काम करायला लागतात. इम्रान मसूद यांनी त्यांच्या टीमला बोलावून त्यांना सर्व समस्या लक्षात घेण्यास सांगितले. वंदे भारत ट्रेन येथील सफाई आणि केटरिंग कर्मचारी एखाद्या यंत्रांसारखे काम करत आहेत. त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जातात. त्यांना दिवसाचे १८ तास काम करायला लावले जात आहे. वंदे भारत ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनही दिले जात नाही, असेही ते म्हणाले.

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त व्हेज जेवण, नॉनव्हेज पर्याय नाही?; IRCTC वर तिकीट काढताना…

दरम्यान, इम्रान मसूद यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी प्रश्न तयार करण्याचे निर्देश दिले. जर वंदे भारत ट्रेन योग्यरित्या चालली तर वेळ दोन तासांनी कमी करता येईल. त्यांनी त्यांच्या टीमला या विषयावर चर्चा करण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच वंदे भारत ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना फक्त तीन तास झोपण्याची परवानगी आहे. स्लीपर क्लासच्या ट्रेनमध्ये झोपण्यासाठी कमीत कमी जागा असते, परंतु वंदे भारतमध्ये झोपण्यासाठीही जागा नसते, असेही नमूद केले.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat's Premium Service Hides Exploitation: Workers Paid Just $120 Monthly

Web Summary : Despite Vande Bharat Express's premium image, workers face exploitation. Employees work 18-hour days for a meager ₹10,000 salary. A Congress MP raised the issue in Parliament, highlighting poor working conditions and demanding better treatment for the staff.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसcongressकाँग्रेसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलIndian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीticketतिकिटfoodअन्नUttar Pradeshउत्तर प्रदेश