शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी लढ्यात सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 06:15 IST

कोरोनाविरोधातील लढ्यात आता वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईला बळकटी मिळावी, यासाठी आता वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्यात येणार असून, वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेलाही चार महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांचीही मदत घेण्यात येईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्ररूप धारण केले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३० लाखांच्याही पुढे गेली आहे. मृत्यूदरही सातत्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातर्फे सोमवारी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षा चार महिने पुढे ढकलून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची कोरोनाकालीन सेवानियुक्ती करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. जे विद्यार्थी १०० दिवसांची सेवा पूर्ण करतील, त्यांना नजीकच्या भविष्यात घेतल्या जाणाऱ्या सरकारी वैद्यकीय सेवांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. तसेच त्यांचा कोविड राष्ट्रीय सन्मानाने गौरव होणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग टेलिकन्सल्टेशनसाठी तसेच कोविड स्थितीचे निरीक्षण करण्यासाठीही केला जाणार आहे. 

त्यासाठी त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणार्थी असलेल्या परिचारिकांची मदतही घेतली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

रिक्त पदांची ४५ दिवसांत भरती

वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका तसेच वैद्यक क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून, राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारा येत्या ४५ दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यांनाही त्यांच्याकडील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाकाळात राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत अतिरिक्त २२०६ वैद्यकीय तज्ज्ञ, ४६८५ वैद्यकीय अधिकारी आणि २५,५९३ परिचारिकांची भरती करण्यात आल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.  ........

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या