कुली, सैनिक आणि अटारी; या तीन शब्दांमुळे पतीला भेटली पाच वर्षांपूर्वी हरवलेली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:55 PM2021-08-23T12:55:48+5:302021-08-23T12:57:30+5:30

Pune News: खरं प्रेम काय असतं, याची प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी परिभाषा आहे. मात्र पुण्यातील येरवडा परिसरात या खऱ्या प्रेमाला परिभाषित करणारी एक घटना समोर आली आहे.

Porters, soldiers and Attari ; These three words made the husband meet the wife he lost five years ago | कुली, सैनिक आणि अटारी; या तीन शब्दांमुळे पतीला भेटली पाच वर्षांपूर्वी हरवलेली पत्नी

कुली, सैनिक आणि अटारी; या तीन शब्दांमुळे पतीला भेटली पाच वर्षांपूर्वी हरवलेली पत्नी

googlenewsNext

पुणे - खरं प्रेम काय असतं, याची प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी परिभाषा आहे. मात्र पुण्यातील येरवडा परिसरात या खऱ्या प्रेमाला परिभाषित करणारी एक घटना समोर आली आहे. त्याचे झाले असे की, पंजाबमधील अटारी बॉर्डरवर (Attari Border) भारतीय लष्करासाठी पोर्टरचे काम करणाऱ्या एका तरुणाची पत्नी पाच वर्षांपूर्वी हरवली होती. मात्र आता पाच वर्षे उलटल्यावर हे दोघेही पुन्हा पुण्यामध्ये भेटले. या पती-पत्नीची भेट घडवून आणण्यामध्ये कुली, सैनिक आणि अटारी या तीन शब्दांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Porters, soldiers and Attari ; These three words made the husband meet the wife he lost five years ago)

यामधील तरुणाचे नाव अमन सिंह आहे. तो अटारी बॉर्डरवर पोर्टरचे (हमाल) काम करतो. त्याची पत्नी महक ही पाच वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी महकचा खूप शोध घेतला. मात्र ती कुठेही दिसून आली नाही. त्यानंतर अमनच्या कुटुंबातील लोकांनी त्यच्यावर  दुसऱ्या लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र अमनचे महकवरील प्रेम कमी झाले नाही. त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच महकची वाट पाहू लागला.

अमन सिंहची पत्नी महक ही मानसिक आजाराने त्रस्त होती. तिच्यावर अमृतसरमध्ये उपचार सुरू होते. तेव्हाच तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या मनावर मोठा आघात झाला. ती घरातून पळाली आणि कुठल्यातरी ट्रेनमध्ये बसून निघून गेली. त्यानंतर अमन आणि त्याच्या नातेवाईकांनी महकचा खूप शोधले. मात्र ती कुठेही दिसून आली नाही.

आता पाच वर्षांनंतर अमनला महक पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये सापडली. पाच वर्षांनंतर झालेली भेट या दोघांसाठीही भावूक करणारा क्षण होता. मिळालेल्या माहितीनुसार पालघर पोलिसांनी महकला आधी ठाण्यातील मनोरुग्णालयात ठेवले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिला तिथून येरवड्यातील मनोरुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.

येरवडा येथे असताना जेव्हा सामाजिक कार्यकर्ता प्रवीणा देशपांडे यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महकच्या बोलण्यामध्ये कुली, सैनिक आणि अटारी हे शब्द सातत्याने येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रवीणा यांनी याबाबत अमृतसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यादरम्यान अमनला त्याची पत्नी महकबाबत माहिती मिळाली. मग अमनने त्वरित पुण्याला धाव घेतली आणि महकची भेट घेतली.  

Web Title: Porters, soldiers and Attari ; These three words made the husband meet the wife he lost five years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.