शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट नोंदविणार पोलीस उपनिरीक्षकाचे बयान

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

अपवादात्मक प्रसंग : सावनेर तालुक्यातील हत्याप्रकरण

अपवादात्मक प्रसंग : सावनेर तालुक्यातील हत्याप्रकरण

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणातील तथ्यांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाचे अतिरिक्त बयान नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात बयान नोंदविण्याचे प्रसंग क्वचितच येतात हे येथे उल्लेखनीय. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.
मनोहर सुरजुसे (३२) असे आरोपीचे नाव असून तो केळवद येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पत्नी शकुंतलाची जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २९ जानेवारी २०११ रोजी घडली होती. पोलीस उपनिरीक्षक नीलेश भदक यांनी शकुंतलाचे मृत्यूपूर्व बयान नोंदविले. त्यात शकुंतलाने मनोहरवर जाळल्याचा आरोप केला आहे. ३० जानेवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे दोन्ही हात जळाले होते. यामुळे भदक यांनी आरोपीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले. त्या पत्रात शकुंतलाने स्वत:ला जाळून घेतले व तिला वाचविताना दोन्ही हात जळाले असे आरोपीने सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. भदक यांनी मृत्यूपूर्व बयान व पत्रात नोंदविलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याची बाब आरोपीचे वकील ॲड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे न्यायालयाने नीलेश भदक यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९१ अंतर्गत अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी २९ जानेवारी रोजी उपस्थित ठेवण्याचे आदेश सरकारी वकिलाला दिले आहेत. बयान नोंदविताना आरोपीलाही उपस्थित ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष दुपारी २.३० वाजता हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.