शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अखेर दोन साधुंच्या निर्घृण हत्येचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासातून धक्कादायक सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:08 PM

रात्रीच्या सुमारास दोन साधुंची निर्घृण हत्या

बुलंदशहर: पालघरमधील दोन साधुंच्या हत्येची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याचा प्रकार घडला. बुलंदशहरमध्ये एका व्यक्तीनं मंदिर परिसरात दोन साधुंची धारदार शस्त्रानं हत्या केली. रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी दोन्ही साधू झोपले होते.उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगोना गावात एक शंकराचं मंदिर आहे. या शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. काल रात्री त्यांची हत्या झाली. मंगळवारी सकाळी ग्रामस्थ मंदिरात पोहोचले. त्यावेळी दोन साधुंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं आढळून आलं. यानंतर मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पोलिसांनी खुन्याला ताब्यात घेतलं आहे. साधुंच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा व्यक्ती नशेच्या आहारी गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर हत्येचं कारणदेखील सांगितलं. 'आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी साधुंचा चिमटा उचलला होता. त्यावरुन साधू त्याला ओरडले होते. त्यानंतर त्यानं काल रात्री साधुंची हत्या केली,' अशी माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिली. लॉकडाऊन सुरू असताना साधुंची हत्या झाल्याची ही देशातली दुसरी घटना आहे. याआधी पालघरमध्ये जमावानं दोन साधू आणि त्यांच्या कार चालकाची निर्घृण हत्या केली. १६ एप्रिलच्या रात्री हा प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी हजर असूनही हा प्रकार घडल्यानं विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश