तक्रार करणा-यालाच पोलिसांनी करायला लावलं बूट पॉलिश

By Admin | Updated: May 30, 2016 11:33 IST2016-05-30T11:33:08+5:302016-05-30T11:33:08+5:30

तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तक्रारदारालाच पोलिसांनी बूट पॉलिश करायला लावल्याची घटना मुझफ्फरनगर येथे घडली आहे

Police booty polished by the complainant | तक्रार करणा-यालाच पोलिसांनी करायला लावलं बूट पॉलिश

तक्रार करणा-यालाच पोलिसांनी करायला लावलं बूट पॉलिश

ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. 30 - उत्तरप्रदेश पोलिसांचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तक्रारदारालाच पोलिसांनी बूट पॉलिश करायला लावल्याची घटना मुझफ्फरनगर येथे घडली आहे. 
 
तक्रार दाखल करुन घ्यायची असेल तर बूट पॉलिश करुन दे अशी अटच पोलिसांनी तक्रारदाराला घातली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तीन पोलीस कर्मचारी बसलेले दिसत आहेत, आणि ही व्यक्ती बाहेर बूट पॉलिश करत आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी असणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  पोलीस महानिरीक्षक संतोष कुमार यांनी दिली  आहे.  
 

Web Title: Police booty polished by the complainant