Narendra Modi : "लाखो लोकांचा जीव वाचवला..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:46 IST2026-02-06T15:45:41+5:302026-02-06T15:46:39+5:30

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग आता बंद करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.

PM Narendra Modi unmanned railway crossings railway safety attack on opposition holi special trains | Narendra Modi : "लाखो लोकांचा जीव वाचवला..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Narendra Modi : "लाखो लोकांचा जीव वाचवला..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग आता बंद करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे रेल्वे अपघातांमध्ये मोठी घट झाली असून लाखो लोकांचा जीव वाचल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

२०१४ पूर्वी केवळ अंमलबजावणीच्या चर्चा होत असत, मात्र रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या अपघातात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागत होता, अगदी शालेय बसच्या अपघातात मुलांच्या मृत्यूच्या बातम्याही येत असत अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधानांनी पुढे म्हटलं की, अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग बंद करणं हे काही फार मोठं काम नव्हतं, परंतु ही जबाबदारी त्यांच्या सरकारलाच पार पाडावी लागली. रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने त्यांनी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. 

याच दरम्यान होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने विक्रमी संख्येत 'होळी स्पेशल' ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे १४१० पेक्षा जास्त विशेष ट्रेन चालवणार असून गरज पडल्यास ही संख्या १५०० पर्यंत वाढवली जाऊ शकते. या सर्व ट्रेन मार्च महिन्यात धावतील.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विभागवार विचार करता सर्वाधिक २८५ ट्रेन 'ईस्ट सेंट्रल रेल्वे' चालवणार आहे, तर 'वेस्टर्न रेल्वे' २३१ आणि 'सेंट्रल रेल्वे' २०९ विशेष ट्रेन चालवल्या जातील. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय, सुरक्षा आणि रेल्वेचे सुरळीत संचालन ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं भारतीय रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

Web Title : लाखों की जान बची: मोदी की घोषणा; रेल यात्रियों के लिए खुशखबरी

Web Summary : पीएम मोदी ने कहा, सभी मानवरहित रेलवे क्रॉसिंग बंद। दुर्घटनाएँ कम हुईं, लाखों जानें बचीं। यात्रियों की भीड़ के कारण भारतीय रेलवे 'होली स्पेशल' ट्रेनें चलाएगा। मार्च के लिए 1410 से अधिक विशेष ट्रेनें नियोजित।

Web Title : Millions Saved: Modi's Announcement; Good News for Rail Passengers

Web Summary : All unmanned railway crossings are now closed, says PM Modi. This reduces accidents and saves lives. Indian Railways will run record 'Holi Special' trains due to passenger rush. Over 1410 special trains planned for March.