शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:53 IST

अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्याअहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाच अपघात होऊन २६५ जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदामध्येच हे विमान एका निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळले. त्यामुळे २५ डॉक्टरांसह २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. विमानामध्ये २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आश्चर्याची बाब म्हणजे या विमान दुर्घटनेत केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला. लंडनमधील रहिवासी असलेले रमेश विश्वासकुमार या अपघातात जखमी झाले तर त्यांच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात २४२ जण होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे विमान दुपारी १.३८ वाजता लंडनला निघाले. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी विमान अपघातातील जखमींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी अपघाताच बचाववेल्या रमेश विश्वासकुमार याचीही भेट घेतली. यावेळी रमेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घडलेल्या घटनेची माहिती दिली. "पंतप्रधान मोदींनी मला अपघात कसा झाला ते विचारलं. त्यावर मी त्यांना घटनाक्रम सांगितला. ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर झालं. मला स्वतःला विश्वास बसत नाहीये की मी त्यातून जिवंत कसा बाहेर आलो. कारण थोड्यावेळासाठी माझाही मृत्यू होणार आहे असं वाटतं होतं. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला कळलं की मी जिवंत आहे. मी सेटबेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. माझ्यासमोरच एअरहोस्टेसचा आणि बाकीच्या लोकांचे मृतदेह पडले होते", असं रमेश विश्वासकुमारने दूरदर्शनसोबत बोलताना सांगितले.

"टेकऑफ नंतर विमानाचा वेग वाढवताच, काहीतरी विचित्र वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले. नंतर अचानक विमानात हिरवी आणि सफेद लाईट सुरु झाली. असं वाटत होतं की जणू काही पायलटने उड्डाणासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती आणि मग ते थेट होस्टलच्या इमारतीत घुसले. विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला," असे विश्वासकुमारने सांगितले.

"दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि सर्व काही जळत होते. या अपघातात माझा डावा हात गंभीरपणे भाजला. बाहेर येताच आग पसरत होती. जर काही सेकंद जास्त उशीर झाला असता तर कदाचित माझ्यासोबतही काही वाईट घडले असते," असं विश्वासकुमारने म्हटलं.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात