शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 9:51 AM

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ जूनला जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहांसह केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. जम्मू-काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी याला विरोध केला. पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवण्यात आली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्व रेकॉर्ड ब्रेक! कोरोना काळात मोदी सरकारला बंपर लॉटरी; इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून या बैठकीला महत्त्वाचे मंत्री उपस्थित असतील. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. यासोबतच जम्मू-काश्मीरमधील भाजप आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेदेखील बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्यात आलं. त्यानंतर राज्यातील अनेक पक्षांनी एकत्र येत पीपल्स अलायन्स फॉर गुप्कार डिक्लेरेशन नावानं एक आघाडी तयार केली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपीBJPभाजपाAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370