शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांच्या 'त्या' प्रश्नांपासून सावध राहा; मोदींचा नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:11 IST

मोदींच्या भेटीनंतर अभिजीत बॅनर्जींची पत्रकारांना सावध उत्तरं

नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर भाष्य करणारे अभिजीत बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना सावधपणे उत्तरं देताना दिसले. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला लक्षवेधी उत्तर दिलं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी टाकलेल्या जाळ्यात अडकू नका, असं मोदींनी भेटीदरम्यान सांगितल्याचं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मोदींची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मोदींसोबतची भेट उत्तम होती. मोदींनी संवादाची सुरुवात एका विनोदानं केली. मला (अभिजीत यांना) मोदीविरोधी विधानं करण्यासाठी माध्यमांकडून कसं भरीस पाडलं जाईल, हे पंतप्रधानांनी भेटीच्या सुरुवातीलाच सांगितलं,' असं बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाले. 'पंतप्रधान टीव्ही पाहतात. त्यांची सगळ्या गोष्टींवर नजर आहे. ते प्रसारमाध्यमांवरही लक्ष ठेवून आहेत. तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) काय करण्याचा प्रयत्न आहात, यावर मोदींची नजर आहे,' असं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिजीत बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत असल्याचं म्हटलं होतं. या विधानानंतर झालेल्या मोदींच्या भेटीबद्दल भाष्य करताना माध्यमांना माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे, याची मला कल्पना असल्याचं अभिजीत बॅनर्जी म्हणाले. भारतातल्या बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट असून परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असं बॅनर्जींनी म्हटलं होतं. भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असून त्यामधून बाहेर पडण्यासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNobel Prizeनोबेल पुरस्कारEconomyअर्थव्यवस्था