शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Attack On Rahul Gandhi : ‘लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले’, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 19:35 IST

PM Narendra Modi In Hubballi: कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

PM Modi In Hubballi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कर्नाटकातील हुबळी-धारवाडमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर जाहीर सभेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर नाव न घेता निशाणा साधला. काही लोक सतत भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे मोदी म्हणाले.

काय म्हणाले पीएम मोदी?“भारत फक्त सर्वात मोठी लोकशाही नाही, तर लोकशाहीची जननी आहे. लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे दुर्दैवी आहे. काही लोक भारताच्या लोकशाहीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही वर्षांपूर्वी मला लंडनमध्ये भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे, पण लंडनमध्येच भारताच्या लोकशाहीवर प्रश्न होणे खूप मोठे दुर्दैव आहे,' अशी टीका मोदींनी केली.

ते पुढे म्हणाले की, 'भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या शतकानुशतके जुन्या इतिहासाने कोरलेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही. भाजपचे डबल इंजिन सरकार कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आज या धारवाडच्या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह येत आहे, जो हुबळी-धारवाडसह संपूर्ण कर्नाटकाच्या भविष्यात सिंचनाचे काम करेल.'

संबंधित बातमी- 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

कर्नाटकातील भाजप सरकारचे कौतुककर्नाटकातील भाजप सरकारचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, '2014 पर्यंत अनेकांकडे पक्के घर नव्हते, शौचालये आणि रुग्णालयांची कमतरता होती. आम्ही प्रत्येक समस्येवर काम केले, लोकांचे जीवन सुखकर केले. आम्ही एम्सची संख्या तीन पट वाढवली आहे. सात दशकात देशात केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर गेल्या 9 वर्षांत 250 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली. कर्नाटकने आज कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आणखी एक टप्पा गाठला आहे. आता सिद्धरुधा स्वामीजी स्टेशनला जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे.' 

संबंधित बातमी- कर्नाटक काबीज करण्यासाठी भाजप सज्ज; मेगा रोड शोमध्ये PM मोदींवर फुलांचा वर्षाव..!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकElectionनिवडणूकPoliticsराजकारण