शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:13 IST

Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे भारतात घडलेल्या मागील दुर्घटनांची आठवण ताजी झाली आहे.

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद इथं नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ टीम पोहचल्या. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की जिथे विमान कोसळले तिथल्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटनेत प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. अद्याप दुर्घटनेत किती मृत्यू झालेत याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

देशातील ५ मोठे विमान अपघात

एअर इंडिया प्लेन क्रॅश (१९७८)

१ जानेवारी १९७८ साली मुंबईच्या अरबी समुद्रात एअर इंडियाचे बोइंग ७४७ फ्लाइट ८५५ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. टेकऑफनंतर काहीच मिनिटांत ही दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाड आणि पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली. यात विमानातील सर्व २१३ प्रवासी आणि पायलटचा मृत्यू झाला.

एअर इंडिया फ्लाइट, कनिष्क विमान दुर्घटना (१९८५)

२३ जून १९८५ साली आयरलँडच्या किनारपट्टीवर अटलांटिक महासागरात एअर इंडिया फ्लाइट १८२  बॉम्बस्फोटाने उडवण्यात आले. खलिस्तान समर्थकांनी केलेला हा दहशतवादी हल्ला होता. ज्यात ३२९ लोकांचा मृत्यू झाला ज्यातील बहुतांश भारतीय मूळ असलेले कॅनडियन नागरीक होते. हा हल्ला भारतातील सर्वात मोठा विमान हल्ला मानला जातो. 

इंडियन एअरलाइन्स दुर्घटना (१९९०)

१४ फेब्रुवारी १९९० साली बंगळुरूच्या एअरबेस A320 विमान लँडिंगवेळी रनवेवर घसरून पुढे शेतात जाऊन कोसळले, त्यात मोठी आग लागली. तांत्रिक बिघाड आणि पायलटची चुकी यामुळे ही दुर्घटना घडली. या विमान अपघातात ९२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

एअर इंडिया एक्सप्रेस (२०१०)

२२ मे २०१० साली दुबईहून मंगळुरूला येणारं एअर इंडिया एक्सप्रेस बोइंग ७३७-८०० फ्लाइट लँडिंगवेळी रनवेवर घसरून दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत १५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 

एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (२०२०)

७ ऑगस्ट २०२० साली केरळच्या कोझिकोड एअरपोर्टवर दुबईहून परतणाऱ्या विमानाचा अपघात झाला. जोरदार पावसामुळे लँडिगवेळी हे विमान रनवेवरून घसरले आणि २ भागात तुटले. या अपघातात २१ जणांचा जीव गेला होता. वंदे भारत मिशन अंतर्गत ही फ्लाईट चालवली जात होती.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातAccidentअपघात