शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पनगढिया

By admin | Updated: January 6, 2015 01:20 IST

नीति आयोगाच्या उपाध्यक्षपदी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया यांची नेमणूक करण्यात आली आहे़

नियुक्त्या जाहीर : गडकरी, स्मृती इराणी विशेष निमंत्रितनवी दिल्ली : नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय) अर्थात नीति आयोगाच्या उपाध्यक्षपदी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया यांची नेमणूक करण्यात आली आहे़ त्यांच्यासोबतच या आयोगाचे सहा सदस्य आणि तीन विशेष निमंत्रितांचीही नियुक्ती करण्यात आली आहे़ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय आणि डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही़ के़सारस्वत यांची आयोगाचे पूर्णवेळ सदस्य, तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधामोहन सिंह हे पदसिद्ध सदस्य असतील. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत यांचा समावेश करण्यात आला आहे़नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाने एक सहापानी निवेदन प्रसिद्ध करून नीति आयोग स्थापन केला. ही नवी संस्था केंद्र आणि राज्य सरकारांसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणार आहे़ त्यात या आयोगात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कोण आहेत पनगढिया ?च्६२ वर्षांचे अरविंद पनगढिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रोफेसर आहेत़ आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कॉलेज पार्क मेरीलँडच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र केंद्रात अर्थशास्त्राचे प्रोफेसर तसेच सहसंचालकपद त्यांनी भूषविले आहे़ च्प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पनगढिया यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना आणि व्यापार व विकासावरील संयुक्त राष्ट्र संमेलनात विविध पदांवर केले आहे.