शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी व सरकारमुळेच पंढरपूर अस्वच्छ

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

- हायकोर्टाचा ठपका : सोमवारी सुनावणी

- हायकोर्टाचा ठपका : सोमवारी सुनावणी
मुंबई : पंढरपूरमध्ये येणारे वारकरी व सरकारचे ढिसाळ नियोजन यामुळे येथे घाणीचे साम्राज्य झाले असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने शुक्रवारी ठेवला. यासंदर्भात ठोस उपाय योजना करण्याचे आदेश येत्या सोमवारी दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़
महत्त्वाचे म्हणजे वारकऱ्यांवर अशाप्रकारे दोष देऊ नये, अशी विनंतीही वारकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली़ मात्र वारकरी नाहीत तर दुसरे कोण येथे येऊन घाण करतात, असा सवाल करत ही घाण होण्याला सरकारही तितकेच जबाबदार आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले़
येथे अधिकृत नोंद असलेले शेकडो मठ आहेत़ या मठांजवळ शौचालये उभी राहिली असती. मुळात वारकरी येणाऱ्या मार्गावर शौचालये व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी शासनाचीच आहे़ असे असताना शासनाने आतापर्यंत काहीच केले नाही़ त्यामुळे पंढरपूरच्या अस्वच्छतेला वारकऱ्यांसोबत शासनही तितकेच जबाबदार आहे, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले़
त्याचवेळी याचिकाकर्त्यांचे वकील असिम सरोदे यांनी पंढरपूर येथे मानवी विष्ठा उचलणाऱ्यांच्या घराच्या प्रश्नाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले़ हे काम करणारे दोनशेहून कर्मचारी असून ते व त्यांचे कुटुंब अशा सुमारे दोन हजार जणांच्या निवाऱ्यावर गदा आली आहे़ कारण हे काम आता बंद करण्यात आले़ त्यामुळे त्यांना किमान कायमस्वरूपी निवारा द्यावा, अशी विनंती ॲड़ सरोदे यांनी केली़
त्यावर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी निवारा देण्याचे पंढरपूर पालिकेने मान्य केले असून पुढील निर्णय शासन दरबारी प्रलंबित असल्याचे पालिकेतर्फे न्यायालयाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने याचाही खुलासा करण्याचे आदेश शासनाला दिले़ पंढरपूर येथे मानवी विष्ठा हाताने उचलली जात असून यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे़ (प्रतिनिधी)