पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: January 26, 2015 03:33 IST2015-01-26T03:33:11+5:302015-01-26T03:33:11+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारतात आगमन होण्याच्या काही तासांपूर्वी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांनी गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Pakistan violates ceasefire once again | पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारतात आगमन होण्याच्या काही तासांपूर्वी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांनी गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पोलिसांनी सांगितले की, पाक सैनिकांनी २४ व २५ च्या मध्यरात्री जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर आरएसपुरा क्षेत्रात जोगवान सीमा चौकीजवळ गोळीबार केला. भारतीय सीमा सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरात कारवाई केली. या गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नाही. २२ जानेवारीलाही सांबा जिल्ह्यातील सीमेवर पाकने आगळीक केली होती. नवीन वर्षात ११ जानेवारीपासून पाकिस्तानी सैनिकांतर्फे सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Pakistan violates ceasefire once again