शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात फडकविले पाकिस्तानचे झेंडे

By admin | Updated: September 25, 2015 23:46 IST

काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी ईदनिमित्त नमाज पठणानंतर तरुणांचे गट आणि सुरक्षा दलात संघर्ष झाला.

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी ईदनिमित्त नमाज पठणानंतर तरुणांचे गट आणि सुरक्षा दलात संघर्ष झाला. श्रीनगरच्या काही भागात निदर्शने करणाऱ्या युवकांनी पाकिस्तान आणि अल-जेहाद या दहशतवादी संघटनेचे झेंडेही फडकविले. दरम्यान, खबरदारी म्हणून सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमाजानंतर तरुणांनी श्रीनगरच्या अनेक भागात पोलीस आणि निमलष्करी दलावर दगडफेक केली. इदगाह, राजौरी, कदल आणि अनंतनाग जिल्ह्यातही काही ठिकाणी संघर्ष झाला. आंदोलनकर्त्या युवकांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधूर सोडावा लागला. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज उमर फारुख, यासिन मलिक, शब्बीर शाह यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राज्यातील इंटरनेट सेवा बंदअसामाजिक तत्त्वांद्वारे देशद्रोही कारवायांसाठी दुरुपयोग होऊ नये म्हणून राज्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. (वृत्तसंस्था)