शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘पेड न्यूज’ला गुन्हा ठरवा, केंद्राला प्रस्ताव

By admin | Updated: October 22, 2014 05:40 IST

त्यामुळे निवडणूक लढविणे ही फक्त बख्खळ पैसा ओतणाऱ्यांची मक्तेदारी होते.

नवी दिल्ली : संसद किंवा विधिमंडळावर निवडून आलेल्या सदस्याची निवड रद्द करून घेण्यासाठी ज्या मुद्द्यांवरून न्यायालयात निवडणूक याचिका केली जाऊ शकते त्यात ‘पेड न्यूज’चा समावेश केला जावा, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे दिला आहे. सध्याच्या कायद्यानुसार निवडणूक प्रचारावर उमेदवाराने करायच्या खर्चाची कमाल मर्यादा ठरविण्याची तरतूद आहे. मात्र पक्षाने प्रचारासाठी किती खर्च करावा यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे निवडणूक लढविणे ही फक्त बख्खळ पैसा ओतणाऱ्यांची मक्तेदारी होते. असे न होता सर्वांना समान संधी मिळावी यासाठी पक्षाने करायच्या निवडणूक खर्चावरही काही कमाल मर्यादा असावी, असेही आयोगाचे मत आहे. संपत म्हणाले की, सध्या आयोग ‘पेड न्यूज’च्या तक्रारींवर आपल्या परीने कारवाई करते. परंतु कठोर कायद्याचे पाठबळ नसल्याने त्यास मर्यादा येतात. आयोगाने विविध राज्यांमध्ये घेतलेल्या भेटींमध्ये अनेक राजकीय पक्षांनीही याविषयी चिंता व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले.प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन यासारख्या माध्यमांवर अंकुश ठेवणाऱ्या संस्थांनीही ‘पेड न्यूज’च्या संदर्भात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, अशीही आयोगाची अपेक्षा असल्याचे संपत म्हणाले.आयोगाने या संदर्भात केलेला प्रस्ताव गेली दोन वर्षे सरकारकडे पडून आहे. आता निवडणूक सुधारणांच्या व्यापक संदर्भाने विधी आयोग विचार-विमर्श करीत आहे.त्यात याचाही विचार केला जाणे अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)