पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:19 IST2026-03-03T14:18:36+5:302026-03-03T14:19:43+5:30

Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.

Pahalgam Terror Attack gopro camera nia china help | पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत

पहलगामच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेला हा हल्ला अलीकडच्या काळातील पर्यटकांवरील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांना एक अत्यंत महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा मिळाला आहे, जो या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करू शकतो.

दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) ने घेतली होती. तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) एक GoPro Hero 12 Black कॅमेरा (सीरियल नंबर: C3501325471706) सापडला आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वीची रेकी, त्यांच्या हालचाली आणि मॉड्यूलच्या तयारीचं चित्रीकरण करण्यासाठी या कॅमेऱ्याचा वापर केला असावा असा संशय यंत्रणांना आहे.

तपासात असं समोर आलं आहे की, हा कॅमेरा ३० जानेवारी २०२४ रोजी चीनमधील डोंगगुआन शहरात एक्टिव्हेट झाला होता. निर्माता कंपनी 'GoPro BV' ने NIA ला माहिती दिली की, हा कॅमेरा चीनमधील 'AE Group International Limited' या कंपनीला पुरवण्यात आला होता. मात्र या कॅमेऱ्याचा अंतिम खरेदीदार कोण होता, याची माहिती कंपनीकडे नाही. त्यामुळे या कॅमेऱ्याचा युजर्स आणि टेक्निकल रेकॉर्ड शोधणं तपासासाठी अत्यंत गरजेचं झालं आहे.

कॅमेऱ्याशी संबंधित तथ्यांची पुष्टी करण्यासाठी NIA आता चीनला 'लेटर रोगेटरी' पाठवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, जम्मूच्या विशेष न्यायालयाने २ मार्च रोजी चीनच्या न्यायिक प्राधिकरणाकडून मदत घेण्यास NIA ला परवानगी दिली आहे.

भारत आणि चीनमध्ये 'MLAT' करार नसल्यामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या 'युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राईम' (UNTOC) मधील तरतुदींचा आधार घेतला जाणार आहे. हा कॅमेरा या कटाचे दुवे जोडण्यासाठी आणि दहशतवादी मॉड्यूलची माहिती देण्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title : पहलगाम आतंकी हमला: GoPro कैमरे के सबूत से NIA को मिला चीन का सुराग

Web Summary : NIA पहलगाम आतंकी हमले की जांच GoPro कैमरे के सबूत से कर रही है। चीन में सक्रिय कैमरे से आतंकी साजिश का पता चल सकता है। NIA UNTOC के माध्यम से चीनी सहायता चाहती है।

Web Title : Pahalgam Terror Attack: GoPro Camera Evidence Leads NIA to China

Web Summary : NIA investigates Pahalgam terror attack using GoPro camera evidence. The camera, activated in China, may reveal terror plot details. NIA seeks Chinese assistance through UNTOC.