शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:39 IST

Pahalgam Terror Attack: आठवडा उलटत आला तरी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही. तसेच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर झालेल्या कारवाया वगळता इतर कारवायांबाबतही निर्णय झालेला नाही. त्यामुळे देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. तसेच या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता आठवडा उलटत आला तरी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही. तसेच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर झालेल्या कारवाया वगळता इतर कारवायांबाबतही निर्णय झालेला नाही. त्यामुळे देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसने सोशल मीडिया अकाउंटवर ‘गायब’ असा एक फोटो टाकत मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडलं, असं शीर्षक देत काँग्रेसने चार फोटो शेअर करून मोदींवर टीका केली आहेत. त्यात मोदींकडून पंतप्रधान म्हणून असलेली अपेक्षा आणि त्यांनी घेतलेली भूमिका यांची तुलना करत टीका करण्यात आळी आहे.

यातील पहिल्या फोटोमध्ये मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर पीडितांना नुकसान भरपाईची घोषणा करायला हवी होती. मात्र मोदींनी बिहारमध्ये जात निवडणुकीसाठी आश्वासनं दिली, असा टोला काँग्रेसने लगाला आहे. तर दुसऱ्या फोटोमधून मोदींनी पहलगाम हल्ल्याबाबत पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी मन की बात केली, असा आरोप काँग्रेसने केला. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी तातडीने काश्मीरचा दौरा करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी निवडणुका असलेल्या बिहारचा दौरा केला, अशी टीका काँग्रेसने तिसऱ्या फोटोमधून केली. तर या हल्ल्यानंतर मोदींनी जखमींची भेट घेणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी राजकीय भेटीगाठींवर भर दिला, असा टोलाही काँग्रेसने चौथ्या फोटोमधून लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला