शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:33 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी केंद्र सरकार बुधवारी महत्त्वपूर्ण बैठका घेणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकापाठोपाठ एक चार बैठका घेणार असून, त्यात काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज आठवडा  उलटला आहे. या  घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट व्यक्त होत आहे. तसेच दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. स्वत: मोदी सुरक्षा दलांकडून याबाबत खडानखडा माहिती मिळवत आहेत. तसेच आता पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी केंद्र सरकार बुधवारी महत्त्वपूर्ण बैठका घेणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकापाठोपाठ एक चार बैठका घेणार असून, त्यात काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्वप्रथम कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत संरक्षणविषयक तयारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर आठवडाभरात दुसऱ्यांदा या समितीची बैठक होणार आहे.

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीपीएची बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, सर्वानंत सोनोवाल आदी मंत्री सहभागी होतील.

त्यानंतर बुधवारी होणारी तिसरी मोठी बैठक ही कॅबिनेटच्या आर्थिक विषयक समितीची असेल.  त्यानंतर कॅबिनेटची बैठक होईल. पहलगाममधील हल्ल्यानंतर होणारी ही कॅबिनेटची पहिलीची बैठक असेल. या बैठकीत संरक्षण विषयक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा होईल. त्यानंतर पुढील रणनीतीबाबत काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत