शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मोदींनी दिले ७४० कोटींचे पॅकेज

By admin | Updated: October 24, 2014 03:39 IST

श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले

श्रीनगर : श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. हॉस्पिटलसाठी १७० कोटी तर घरांच्या बांधणीसाठी ५४० कोटी रूपये केंद्र सरकार उपलब्ध करणार असल्याची घोषणा मोदी यांनी केल्याने जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांना वेगळी दिवाळी भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौ-यावर काँग्रेसने टीका केली असून हा सर्व पब्लिसिटी स्टंट असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी यांनी आज सियाचीनमधील जवानांचीही भेट घेतली. भारतातील प्रत्येक नागरिक तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहे असे आश्वासनही मोदींनी या जवानांना दिले. दिवाळीनिमित्त श्रीनगरमध्ये आलेल्या मोदींनी गुरुवारी सकाळी सियाचीनमधील जवानांसोबत काही काळ घालवला. बिकट स्थितीतही देशाची रक्षा करणाऱ्या या जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, केवढीही उंची असो किंवा थंडी, आमच्या जवानांना कोणीच रोखू शकत नाही. ते जिथे उभं राहून भारताची सेवा करतात त्याचा प्रत्येकाला गौरव वाटतो. जवानांशी संवाद साधल्यावर मोदी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये आले. या दौ-यासाठी येण्यापूर्वी मोदींनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना मांडल्या. सियाचीनमध्ये कार्यरत असलेल्या शूरवीर जवानांसोबत वेळ घालवणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)