नवी दिल्ली: मागील पाच वर्षात दररोज २०पेक्षा अधिक भारतीय कामगारांचा विदेशात मृत्यू झाला असून बहुतांश घटना आखाती देशांत घडल्या आहेत.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत परदेशात मरण पावलेल्या भारतीय कामगारांची एकूण संख्या ३७७४० इतकी झाली आहे. या मृत्यूंच्या कारणांची मात्र माहिती देण्यात आलेली नाही. २०१२ ते २०१८च्या मध्यापर्यंत आखाती देशांत दररोज जवळपास १० भारतीय कामगारांचा मृत्यू होत होता.
विदेशात भारतीय कामगारांच्या मृत्यूची आकडेवारी (२०२१-२०२५)
२०२१- ८२३४
२०२२- ६६१४
२०२३- ७२९१
२०२४- ७७४७
२०२५- ७८५४
देशनिहाय मृत्यू (मुख्य देश) कालावधी
एकूण मृत्यू : ३४,५२३
१७६० कतार
१९१५ मलेशिया
२८२१ ओमान
३८९० कुवेत
१२३८० यूएइ
११७५७सौदी अरेबिया
कामगारांच्या समस्या
विलंबाने मिळणारा पगार किंवा पगारच न मिळणे किंवा सेवा समाप्तीवेळी असलेले लाभ नाकारले जाणे.
नोकरी देणाऱ्यांकडून पासपोर्ट ताब्यात ठेवला जाणे, रजा न देणे, अतिरिक्त वेळ काम करूनही ओव्हरटाईम न मिळणे, कंपनी अचानक बंद झाल्याने आलेली बेकारी.
नोकरी देणाऱ्यांकडून होणारे गैरवर्तन, कायदेशीर हक्क नाकारणे, करार पूर्ण झाल्यावर परतण्यासाठी व्हिसा न देणे.
Web Summary : Over the past five years, more than 20 Indian workers have died daily abroad, mainly in Gulf countries. From 2021-2025, 37,740 deaths occurred. Common issues include unpaid wages, passport confiscation, denied leave, and employer mistreatment.
Web Summary : पिछले पांच वर्षों में, खाड़ी देशों में हर दिन 20 से ज़्यादा भारतीय कामगारों की मौतें हो रही हैं। 2021-2025 तक 37,740 मौतें हुईं। वेतन न मिलना, पासपोर्ट ज़ब्त करना और शोषण आम समस्याएँ हैं।