शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

राजेश्‍वर सिंग यांना ईडीचे उपसंचालक नियुक्त करण्याचा आदेश

By admin | Updated: September 9, 2014 04:05 IST

२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासह अन्य अनेक प्रकरणांतील मनी लाँडरिंगच्या पैलूंची चौकशी करीत असलेले राजेश्‍वर सिंग यांना तीन दिवसांच्या आत अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) स्थायी उपसंचालक बनविण्यात यावे,

नवी दिल्ली : २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासह अन्य अनेक प्रकरणांतील मनी लाँडरिंगच्या पैलूंची चौकशी करीत असलेले राजेश्‍वर सिंग यांना तीन दिवसांच्या आत अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) स्थायी उपसंचालक बनविण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिला.'केंद्र सरकार आजपासून तीन दिवसांच्या आत उपसंचालक म्हणून राजेश्‍वर सिंग यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आल्याची पुष्टी करेल,' असे न्या. एच.एल. दत्तू आणि न्या. एस.ए. बोबडे यांच्या पीठाने स्पष्ट केले. राजेश्‍वर सिंग यांना अंमलबजावणी संचालनालयात स्थायी स्वरूपात नियुक्त करण्याचे निर्देश केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) गेल्या २४ डिसेंबर रोजी दिले होते. त्याचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. 'तुम्ही (केंद्र सरकार) लवादाने जारी केलेल्या सकारात्मक निर्देशांचे पालन करीत नाही. लवादाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी तुमची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. तरीही तुम्ही आठ महिनेपर्यंत प्रतीक्षा केली,' असे न्यायालयाने केंद्राला सुनावले.'आम्ही एक आदेश पारित करून अंमलबजावणी संचालनालयात राजेश्‍वर सिंग यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचे तुम्हाला सांगू. या न्यायालयाने चौकशीच्या संचालनाबाबत सिंग यांच्यावर विश्‍वास ठेवला आहे. त्यांनी न्यायालयात खटला लढावा आणि सोबतच प्रकरणाचा तपासही करावा, अशी तुमची अपेक्षा आहे काय? केंद्राने कॅटच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे,' असे न्यायालयाने सांगितले. (वृत्तसंस्था)