शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच लोकसभाध्यक्षांना विरोधकांनी बनविले लक्ष्य

By admin | Updated: April 23, 2015 23:39 IST

कालपर्यंत सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाच लक्ष्य बनवत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांचे विधान

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकालपर्यंत सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाच लक्ष्य बनवत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांचे विधान कामकाजातून न वगळण्यासाठी जोरदार दबाव आणला. प्रथमच विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांशी थेट संघर्ष पुकारल्याचे चित्र बघायला मिळाले.राजस्थानमधील शेतकरी गजेंद्रसिंग याच्या जाहीर आत्महत्येचे प्रकरण अपेक्षेप्रमाणे सभागृहात तापले. गजेंद्रचा मृत्यू देशाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. तो व्यवस्थेमुळे दु:खी होता. आम्हाला व्यवस्था ताळ्यावर आणावी लागेल केवळ ‘मन की बात ’ केल्याने ही व्यवस्था बदलणार नाही, असे विधान मान यांनी केल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी एकच गदारोळ केला. अध्यक्ष महाजन यांनी ‘मन की बात’ संबंधी त्यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्याचा आदेश देताच विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. सोनिया गांधी यांनी आपल्या आसनावर बसूनच विरोध दर्शवित काँग्रेसच्या सदस्यांना विरोध करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, दीपेंद्र हुडा, राजीव सातव यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक होत लोकसभा अध्यक्षांनाच जाब विचारला. गदारोळ होत असतानाच संपूर्ण विरोधक अध्यक्षांनी दिलेल्या आदेशावर एकजूट झाल्याचे दिसले.