शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी मोदींचे आवाहन धुडकावले

By admin | Updated: December 5, 2014 02:04 IST

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़ त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ मात्र पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या विरोधकांनी ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली़ यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही संसदेत या मुद्यावर प्रचंड गदारोळ झाला़विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज पाच वेळाच्या स्थगितीनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले़ लोकसभेत विरोधकांनी या मुद्यावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत सभात्याग केला़ पंतप्रधानांनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू आणि सभागृहाचे नेते तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही विरोधकांना संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली़ विरोधक मात्र याउपरही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले़ ज्योती यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केलेली आहे़ माफी मागितलेली नाही, याकडेही काँग्रेस, माकपा, जदयू आदी नेत्यांनी लक्ष वेधले़ या गोंधळात राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले आणि सरतेशेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यातआले़ तिकडे लोकसभेत पंतप्रधानांनी या मुद्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करीत विरोधकांनी सभात्याग केला़ गत तीन दिवसांपासून ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे़ सरकारने मात्र ज्योती यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा संपल्याचे सांगून ही मागणी धुडकावून लावली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)