शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Opinion Poll: राजस्थान, म. प्रदेश, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार? मतदार काँग्रेसला 'हात' देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:09 PM

तीन महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून जाण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षाच्याअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिन्ही राज्यातील जनता काँग्रेसला 'हात' देण्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांना धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपाला 40 टक्के, तर काँग्रेसला 42 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण 230 आमदार निवडून जातात. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार एकूण 230 पैकी 117 जागांवर काँग्रेसला यश मिळेल. तर भाजपाला 106 जागांवर समाधान मानावं लागेल. विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधी चित्र असलं, तरी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश मोदींना साथ देईल, असं सर्वेक्षणातील आकडे सांगतात.छत्तीसगडमध्येदेखील भाजपाला धक्का बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रमण सिंह नेतृत्त्व करत असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला 39 टक्के, काँग्रेसला 40 टक्के आणि इतर पक्षांना 21 टक्के मतदान होईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. मतदानाच्या टक्केवारीत भाजपा-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असली, तरी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असं आकडेवारीवरुन दिसतं आहे. 90 जागा असलेल्या छत्तीसगडच्या विधानसभेत काँग्रेसला 54, तर भाजपाला 33 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र मध्य प्रदेशप्रमाणेच छत्तीसगडदेखील लोकसभेत मोदींना साथ देईल, अशी शक्यता आहे. राजस्थानमध्येही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारखंच चित्र दिसेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे. राजस्थानातील जनता विधानसभा निवडणुकीत हाताला साथ देईल, असा अंदाज आहे. राजस्थानात विधानसभेचे 200 मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 57 टक्के मतांसह 130 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर भाजपाला 37 टक्के मतं मिळतील. त्यांना अवघ्या 57 जागांवर समाधान मानावं लागेल, अशी शक्यता आहे. विधानसभेत हाताला साथ देणारं राजस्थान लोकसभेत मात्र मोदींच्या पाठिशी उभं राहील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस