शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:28 IST

शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत. 

शाळा म्हणजे विद्येचं मंदिर असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. याचं ठिकाणी आपल्याला आयुष्यभराचं ज्ञान मिळतं. मात्र, आता असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही देखील स्तब्ध व्हाल. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा नुकत्याच एका शाळेत निरीक्षणासाठी पोहोचल्या असता, जे सत्य समोर आलं त्याने त्यांनाही धक्का बसला. या शाळेच्या वर्गात अवघे १२ विद्यार्थी शिकत होते, मात्र शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत. 

सदर प्रकार उत्तर प्रदेशच्या फॉक्सगंजमधून समोर आला आहे. या भागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेला राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष चारु चौधरी यांनी भेट दिली. या शाळेत एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. चारपैकी तीन शिक्षिका रजेवर होत्या आणि एकच शिक्षिका मुलांना शिकवत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गात फक्त १२ विद्यार्थी उपस्थित होते, तर रजिस्टरमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांची नोंद होती. 'देशाचे पंतप्रधान कोण?' असा प्रश्न विचारलं असता, मुलांना उत्तर देखील देता आले नाही. 

उत्तर प्रदेश सरकार अंगणवाडी केंद्रांद्वारे प्राथमिक शाळा आणि पूर्व-प्राथमिक शाळा चालवते. मात्र, प्रत्यक्षात समोर काही वेगळेच सत्य आले आहे. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा चारू चौधरी यांनी गाजीपूरला भेट दिली आणि कोतवाली परिसरातील फॉक्सगंज प्राथमिक शाळेला भेट दिली, तेव्हा शाळेतील गैरकृत्ये उघडकीस आली. आधीच शाळेत ३ शिक्षिका एकाचवेळी सुट्टीवर असल्याचे आणि रजिस्टरमध्ये खोटी नोंद असल्याचे पाहून चारू चौधरी यांनी उपस्थित असलेल्या शिक्षिकेला फटकारले आणि फोनवरून मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना ही बाब कळविण्यास सांगितले.

काही महिन्यांपूर्वी, मूलभूत शिक्षण विभागाने कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांसाठी विलीनीकरण मोहीम सुरू केली, ज्यावर बराच राजकीय वादविवाद झाला. आता शाळांचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशी आशा होती, परंतु परिस्थिती तशीच आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र