शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:15 IST

Onion Farmer Price Crash: तीन महत्त्वाच्या बाजारपेठा गमावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागे केवळ देशांतर्गत धोरणेच नव्हे, तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णयही जबाबदार आहेत.

भारताच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी निराशाजनक बातमी आहे. एकेकाळी भारतीय कांद्याचे प्रमुख आयातदार असलेले बांगलादेश, सौदी अरब आणि फिलिपिन्स या देशांनी भारताकडून कांदा खरेदी करणे जवळपास थांबवले आहे. भारतानेच देशातील महागाई कमी करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंधणे आणल्याने या देशांना पाकिस्ता, येमेन आणि इराणकडून कांदा मागवावा लागत आहे. याचा फटका भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 

तीन महत्त्वाच्या बाजारपेठा गमावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागे केवळ देशांतर्गत धोरणेच नव्हे, तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णयही जबाबदार आहेत. देशांतर्गत महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार कांदा निर्यात शुल्क वाढवणे आणि अस्थायी निर्यात बंदी यासारखे निर्णय घेतले आहेत. याचा परिणाम असा झाला की, वारंवार बदलणाऱ्या या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांची विश्वासार्हता कमी झाली आहे. 

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बांगलादेशने आता स्थानिक उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे आणि त्यांनी पाकिस्तान आणि चीन यांसारख्या पर्यायी पुरवठादारांकडून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशात स्थानिक कांदा बाजारात आल्यामुळे त्यांनी भारताकडून खरेदी करणे जवळपास थांबवले आहे. एवढेच नाही तर सौदी अरेबियाने भारतीय निर्यातदारांना आयात परवाने देणे थांबवले आहे. सौदीला येमेन आणि इराणकडून त्यांना अधिक स्पर्धात्मक दरात कांदा मिळू लागला आहे. 

भारतीय कांद्याचे बियाणे वापरून बांगलादेश, श्रीलंका आणि चीनसारखे देश आता स्वतः कांद्याचे उत्पादन घेत आहेत. अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत आहे. कांदा उत्पादक संघटनांनी सरकारकडे दीर्घकाळ टिकणारे आणि शेतकरी-केंद्रित निर्यात धोरण लागू करण्याची तसेच निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Export Crash: India's policies backfire; Bangladesh, Saudi turn away.

Web Summary : India's onion export faces crisis as Bangladesh, Saudi Arabia, Philippines halt imports due to fluctuating export policies. Farmers suffer losses as these nations turn to Pakistan, Yemen, Iran. Local production increases abroad, impacting Indian farmers.
टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी