शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तीन भावांपैकी एकाची जन्मठेप कायम

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

हायकोर्ट : दोघांना सहा वर्षे सश्रम कारावास

हायकोर्ट : दोघांना सहा वर्षे सश्रम कारावास

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील आरोपी तीन सख्ख्या भावांपैकी एकाची जन्मठेप कायम ठेवली, तर दोघांना सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना गोंदिया येथील आहे.
पर्वेश मनोहर रामटेके (४०) असे जन्मठेप कायम असलेल्या तर, संदेश (२८) व नीलेश (३०) अशी त्याच्या भावांची नावे आहेत. मृताचे नाव अंकित नंदागवळी होते. २ ऑगस्ट २०१० रोजी सायंकाळी ७ वाजता पर्वेशने अंकितची चाकूने भोसकून हत्या केली. अन्य दोघांनी अंकितला पकडून ठेवले होते. त्यापूर्वी पर्वेशने मनोज कुकरेजाला चाकूने गंभीर जखमी केले होते.
२९ सप्टेंबर २०१२ रोजी गोंदिया सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप सुनावली होती. पर्वेशला कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गतही जन्मठेप झाली होती. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता पर्वेशची भादंविच्या कलम ३०२ अंतर्गतची जन्मठेप कायम ठेवून कलम ३०७ अंतर्गतची जन्मठेप रद्द केली. संदेश व नीलेशला कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत सहा वर्षे सश्रम कारावास सुनावला.