शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार पगार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:19 IST

देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, देशभरात सर्वत्र कामगारांचा पगार दर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशीच होणे आवश्यक आहे. खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी हे हिताचे ठरेल.ते म्हणाले की, ‘वन नेशन-वन डे पे' योजनेसंदर्भातील कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इच्छा आहे. सेंट्रल असोसिएशन फॉर प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्वच क्षेत्रामध्ये किमान समान वेतनासाठी काही नियमही बनविणार आहे. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अगदी प्रारंभापासूनच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालीे. व्यापार प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी देशातील विविध क्षेत्रांकरिता सिंगल पेज मेकॅनिझम तयार केला आहे.>१३ कामगार कायद्यांचे विलीनीकरणसंतोष गंगवार यांनी सांगितले की, आॅक्युपेशनल सेफ्टी, आरोग्य व कामाच्या ठिकाणची स्थिती (ओएसएच) यासंदर्भातील कायदा लागू करणार आहे. त्यामध्ये वेतनाच्या मुद्द्याचाही अंतर्भाव आहे. या गोष्टींशी संबंधित १३ कामगार कायद्यांचे विलिनीकरण करून एकच कायदा बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना या कायद्यातील तरतुदींचा लाभ मिळू शकेल.