गुजरातमध्ये पुन्हा एकदा भर कार्यक्रमात पैशांचा पाऊस; १०, २० आणि १०० ₹च्या नोटांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:35 AM2023-03-13T06:35:46+5:302023-03-13T06:37:39+5:30

कार्यक्रमाला आलेले लोक इतके प्रभावित झाले की, नोटांचा वर्षाव केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

once again rain of money in kirtidan gadhvi program in gujarat | गुजरातमध्ये पुन्हा एकदा भर कार्यक्रमात पैशांचा पाऊस; १०, २० आणि १०० ₹च्या नोटांचा वर्षाव

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भर कार्यक्रमात पैशांचा पाऊस; १०, २० आणि १०० ₹च्या नोटांचा वर्षाव

googlenewsNext

वलसाड: गुजरातचे प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी गुजरातमधील वलसाडमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडताना दिसला. गढवी यांचे गाणे ऐकून कार्यक्रमाला आलेले लोक इतके प्रभावित झाले की, त्यांनी गढवींवर १०, २० आणि १०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गढवी यांचा जन्म मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वलवोद येथे झाला. कीर्तिदान हे भावनगर विद्यापीठात संगीत शिक्षक होते.
गढवी यांना अमेरिकेत वर्ल्ड अमेझिंग टॅलेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, ते वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, यूएसएचे ब्रँड ॲम्बेसेडरही राहिले आहेत. सध्या ते कच्छ जिल्ह्यातील काठियावाड येथे राजकोटमध्ये राहत आहे.

गढवी यांनी २०१५ मध्ये गुजरातमधील जामनगर येथील गोरक्षण रॅलीमध्ये गायला सुरुवात केली, त्यामधून त्यांना तब्बल ४५ दशलक्ष रुपये मिळाले. एप्रिल, २०१५ मध्ये त्यांनी एका टीव्ही शोमध्ये सचिन-जिगर, तनिष्का आणि रेखा भारद्वाजसोबत लाडकी हे गाणे गायले, ज्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. कीर्तिदान गढवी यांच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक कार्यक्रमांत गढवी यांच्यावर पैसे उधळण्यात आले आहेत. पैशांचा पाऊस पडत असतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: once again rain of money in kirtidan gadhvi program in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात