शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

Air India कर्मचाऱ्यांना घरे सोडण्याची नोटीस, अनुचित कामगार प्रथेचा अवलंब झाल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:38 IST

Air India employees: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कालिना येथे कंपनीने उपलब्ध करून दिलेली निवासस्थाने (अपार्टमेंट्स) ६ महिन्यांत रिकामी करण्यास सांगण्यात आल्यानंतर एअर इंडिया युनियन्सनी संपाची नोटीस दिली आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कालिना येथे कंपनीने उपलब्ध करून दिलेली निवासस्थाने (अपार्टमेंट्स) ६ महिन्यांत रिकामी करण्यास सांगण्यात आल्यानंतर एअर इंडिया युनियन्सनी संपाची नोटीस दिली आहे.

मुंबई विभागीय कामगार आयुक्तांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यामुळे निवासस्थाने सोडण्यास सांगण्यात आले आहे. प्रमाणित पद्धतीनुसार कोणत्याही संघटनेने संप करण्याआधी २ आठवड्यांची नोटीस देणे आवश्यक असते. त्यामुळे संयुक्त कृती समितीने २ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचा दावा नोटिसीत केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एअरलाईनकडून पत्र मिळाले. २० ऑक्टोबरपर्यंत कंपनीला कर्मचाऱ्यांनी आम्ही कंपनीने दिलेली घरे ६ महिन्यांच्या आत रिकामी करीत आहोत, असे लेखी कळवायचे आहे. एअर इंडिया युनियन्स संयुक्त कृती समितीत एअर कार्पोरेशन एम्प्लॉईज युनियन एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्ड आणि ऑल इंडिया सर्व्हिस इंजिनियर असोसिएशनचा समावेश आहे.

... तर कर्मचारी, कुटुंबीय रस्त्यावर येतीलमहाव्यवस्थापक (औद्योगिक संबंध) मीनाक्षी काश्यप यांना दिलेल्या पत्रात युनियन्सनी म्हटले आहे की. “मुंबईत ज्यांना घरे नाहीत आणि ज्यांना घरभाडे भत्ता दिला जात नाही त्या कर्मचाऱ्यांना निवासस्थाने दिले गेली आहेत. सेवा नियमांनुसार हे कर्मचारी सेवेत आहेत तोपर्यंत निवासस्थान मिळण्यास कायदेशीररीत्या पात्र आहेत. जर त्यांना बेघर व्हावे लागले तर नोकरीच्या शेवटी ते आणि त्यांचे कुटुंबीय थेट रस्त्यांवर येतील. घरे रिकामी करण्याची नोटीस हे अनुचित कामगार प्रथा असल्याचे पत्रात म्हटले आहे. सामान्यत: कर्मचारी कुटुंबीयांसह निवृत्तीपर्यंत कॉलन्यांत राहतात. त्यांना एकतर्फी बेघर करणे हे त्यांच्या सेवाशर्तीचा भंग करणे व कायदेशीर हक्क नाकारणेच होय, असेही पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाEmployeeकर्मचारी