शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा सहिष्णुतेचा इतिहास कोणीही बदलू शकणार नाही

By admin | Updated: February 7, 2015 02:39 IST

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील असहिष्णुतेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेबाबत भारत सरकारने सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारची प्रतिक्रिया: ओबामा म्हणाले होते भारतात असहिष्णुता वाढलीनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील असहिष्णुतेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेबाबत भारत सरकारने सावध प्रतिक्रिया दिली आहे. संयम, सहिष्णुता हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून, हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही असे भारताने म्हटले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात ही बाब त्यांनी रेखांकित के ली. ओबामा बोलत होते, तेव्हा त्यांच्याजवळ तिबेटी धर्मगुरूदलाई लामा बसले होते. दलाई लामा गेली कित्येक वर्षे भारतात आपल्या अनुयायांसह राहत असून, हीच बाब सहिष्णुतेची निदर्शक आहे असे राजनाथ म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क) व्हाईट हाऊसकडून सारवासारववॉशिंग्टन : गेल्या काही वर्षात भारतात असहिष्णुता इतकी वाढली आहे, की जन्मभर अशा धार्मिक तेढीविरोधात आग्रही असणाऱ्या महात्मा गांधीजींनाही यामुळे धक्का बसला असता, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी व्यक्त केले होते. मोदी सरकारला सणसणीत चपराक असल्याचे मानले जात असलेल्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. भारतात अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना हा भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप असल्याचा घणाघात केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने आज सारवासारव केली असून, जगातील कोणत्याही देशातील असहिष्णुतेचा सामना करण्यासाठी गांधीजींचे विचार आजही प्रेरक ठरतात असे म्हटले आहे. ओबामा यांनी हे वक्तव्य करताना कोणत्याही धर्माचा उल्लेख केला नाही; पण या वक्तव्यामुळे भारतात खळबळ माजल्यानंतर व्हाईट हाऊसने तातडीने यावर स्पष्टीकरण दिले. महात्मा गांधीजींचा वारसा ही मोठीच प्रेरणा आहे. अमेरिकेत, जगात कोणत्याही देशात असहिष्णुतेची घटना घडली तर गांधीजींचे विचारच प्रेरक ठरतात, असे व्हाईट हाऊसच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते मार्क स्ट्रोह यांनी सांगितले.